शुक्रवार, ७ जुलै, २०१७

राज्यात नाविन्यता सोसायटीची स्थापना - ८ जुलै २०१७

राज्यात नाविन्यता सोसायटीची स्थापना - ८ जुलै २०१७

* युवकांच्या सर्जनशीलता, नवनिर्मिती आणि संकल्पनेला वाव देण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची स्थापना करण्यात आली.

* यामध्ये कौशल्य विकास व उद्योजकता मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाचे सचिव, विद्यापीठांचे कुलगुरू, आणि संशोधन संस्थांच्या संचालकांचा ३० सदस्यीय समितीमध्ये समावेश आहे.

* युवकांमधील सर्जनशीलता विकसित करून त्यांच्यातील प्रतिभेच्या माध्यमातून नवनिर्मिती करणे, त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, नाविन्यपूर्ण संकल्पनांचा विकास करणे, नवीन कार्यपद्धती, वितरण प्रणाली, हे सर्व कार्ये गतिमान आणि संवेदनशील पद्धतीने शासनस्तरावर निर्माण करणे.

* मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या परिषदेचे कामकाज नियोजन विभागाकडून कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.

* या परिषदेचे गव्हर्निंग बॉडी आणि गव्हर्निंग कौन्सिल असे दोन स्तर आहेत. गव्हर्निंग बॉडीमध्ये कौशल्य विकास उद्योजकता मंत्री पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत.

* तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर हे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. तसेच गव्हर्निंग कौन्सिलमध्ये एकूण ७ सदस्य आहेत. त्यात कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाचे सचिव काम पाहतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.