गुरुवार, ६ जुलै, २०१७

आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणींने जिंकली - ६ जुलै २०१७

आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणींने जिंकली - ६ जुलै २०१७

* भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने बुधवारी लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.

* सर्वात आधी अडवाणीने मोहंमद बिलालाविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानी खेळाडूने अडवाणीविरुद्ध फाउलने पहिला गुण मिळवला.

* भारतीय खेळाडूने ८३ च्या शानदार ब्रेकने जोरदार मुसंडी मारत बेस्ट ऑफ फाईव्ह फायनलमध्ये पहिला फ्रेम आपल्या नावावर केला.

* अडवाणीने याने सांघिक स्पर्धेत एकही वैयक्तिक लढत गमावलेली नाही. भारत अ संघात मल्कीतसिंग यांचादेखील समावेश आहे.

* अडवाणीचे हे या हंगामातील दुसरे आणि आशियाई आणि एकूण ८ वे [ सहा बिलिडियर्स - ६ रेड एक टीम स्नूकर ] विजेतेपद आहे तर सिंह याच्यासाठी हे पहिलेच अजिंक्यपद आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.