बुधवार, १२ जुलै, २०१७

चीनचा ऐतिहासिक सैन्यकपातीचा निर्णय - १३ जुलै २०१७

चीनचा ऐतिहासिक सैन्यकपातीचा निर्णय - १३ जुलै २०१७

* जगातील सर्वात मोठी सैन्याची फौज असलेल्या चीनने आपले सैन्य कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

* चीनमध्ये १९८० पर्यंत सैनिकांची संख्या ४५ लाख होती. १९८५ मध्ये ही संख्या ३० लाखावर आणण्यात आली. सध्या ती २३ लाखावर आली आहे.

* २३ लाखांचे विशाल सैन्य असलेल्या चीननं १३ लाखापेक्षा अधिक सैनिकांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

* चीन सरकारचे अधिकृत असलेल्या पीएलए डेलीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. वृत्तानुसार चीन सरकारने आपली सैन्यक्षमता १० लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* चीन सरकारने आपल्या सैन्याची पुनरर्चना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सैन्याची संख्या कमी करून स्ट्रॅटिजिक सपोर्ट फोर्स नौदल रॉकेट फोर्समधील सैन्याचे प्रमाण वाढवले जाणार आहे.

* तर चिनी हवाई दलातील सैनिकांची संख्या पूर्वीइतकीच ठेवण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.