बुधवार, ५ जुलै, २०१७

भारतात गेल्या ३ वर्षात रोजगार स्थितीत लक्षणीय बिघाड - ६ जुलै २०१७

भारतात गेल्या ३ वर्षात रोजगार स्थितीत लक्षणीय बिघाड - ६ जुलै २०१७

* आर्थिक विकास दर उंचावत केल्याचे दावे केले जात असताना, अपेक्षित रोजगारनिर्मिती होत नसल्याच्या टिकेकडून सरकार जरी गांभीर्याने पाहत नसली तरीही सरकारच्या कामगार विभागाकडून पुढील आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

* मी माझ्या पदवीचे काय करायचे या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

[ अहवालातील ठळक मुद्दे ]

* गेल्या ३ वर्षात शिक्षित तरुणांना नोकऱ्या अधिकाधिक दुरापास्त बनत गेल्या असल्याचे चित्र पुढे गेले आहे.

* २०१६-१७ च्या आर्थिक वर्षाच्या डिसेम्बरपर्यंतच्या ९ महिन्यात [ बँकिंग क्षेत्र वगळता ] अवघ्या १९ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या.

* जे त्या वर्षात पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या ८८ लाख तरुणांच्या तुलनेत खूपच तोकड्या असल्याचे कामगार विभागाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

* अहवालात म्हटले आहे की सार्वजनिक क्षेत्र, निर्मिती क्षेत्र, आयटी व आयटीपुरक सेवा क्षेत्र, बँका, वित्तीय सेवा, आणि विमा आदी पारंपारिकरित्या नोकऱ्या निर्माण करणाऱ्या क्षेत्रात नव्याने भरतीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे.

* सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या खाजगी क्षेत्राचे २००० सालापासून मंदावलेपण हे एकंदर रोजगार स्थितीत बिघाडामागील मुख्य पैलू आहे.

* सार्वजनिक व खाजगी संघटित रोजगारनिर्मितीचे गुणोत्तर हे २००१ मधील २.४ पटीवरुन २०१२ सालात १.६ पटीवर खाली आले आहे.

* केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वार्षिक सरासरी वाढीचे प्रमाण या काळात २.३% राहिले आहे.

* देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात ६५% वाटा असणाऱ्या ९ प्रमुख श्रमप्रवण क्षेत्रातून आर्थिक वर्ष २०११ ते २०१३ दरम्यान २५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या.

* याच काळात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या तरुण पदवीधरांची संख्या ही २.२७ कोटी एवढी होती.

* ज्यातून प्रत्येक ९ पदवीधरामागे एका नोकरीची निर्मिती असे गुणोत्तर त्या ३ वर्षात होते. तर त्या पुढची ३ वर्षे हेच प्रमाण प्रत्येक २७ पदवीधरामागे १ नोकरी असे ३ पटीने वाईट बनले आहे.

* उल्लेखनीय म्हणजे २०१६-१७ च्या नऊमाहित निर्माण झालेल्या १९ लाख नवीन नोकर्यांमध्ये ९०% वाटा असलेल्या वस्त्रोद्योग, आयटी\बीपीओ आणि बॅंकामध्ये मंदावलेली चिन्हे दिसून येत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.