शनिवार, १ जुलै, २०१७

संगणक व्हायरस पेट्या रॅनसमवेअर भारतासह अनेक देशांवर हल्ला - २ जुलै २०१७

संगणक व्हायरस पेट्या रॅनसमवेअर भारतासह अनेक देशांवर हल्ला - २ जुलै २०१७

* गेल्या महिन्यातील सायबर हल्ल्यानंतर मुंबईतील जेएनपीटी बंदराच्या कार्यालयीन डेटा  पेट्या रॅनसमवेअर या व्हायरस च्या आहारी गेला आहे. तसेच जगातील बरेच देश आणि युरोपसह जगभरातील देशांना लक्ष्य केले आहे.

* रशिया, फ्रांस, स्पेन, आणि युरोपमधील अन्य देशामधील ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, ऑइल आणि गॅस कंपन्या, या व्हायरसच्या प्रमुख लक्ष्य ठरल्या आहेत.

* युक्रेनला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेथे सरकारी विभाग, वीज कंपन्या, विमानतळ, आणि बँकांमधील कम्प्युटर हॅक झाले आहे.

* भारतालाही या हल्ल्याची झळ बसली आहे. जेएनपीटी येथील कामकाज ठप्प पडले आहे. गेल्या महिन्यातील जगातील सुमारे १५० देशांना वान्नाकाय पेट्या रॅनसमवेअर व्हायरसचा फटका बसला आहे. पिटरॅप पेट्या हे या व्हायरसचे नवीन व्हर्जन आहे.

*  पेट्या रॅनसमवेअर हा मालवेअरचा एक प्रकार असून यामुळे संगणकातील माहिती रिमोटच्या साहाय्याने लॉक करता येते आणि संगणक बंद पडतो.

*  पेट्या रॅनसमवेअर या व्हायरसमुळे संगणक बंद पाडून संगणक अनलॉक करण्यासाठी संगणक हॅकर्स पैशाची मागणी करतात. याला सोप्या भाषेत संगणक चोरी किंवा संगणक दहशतवाद असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.