रविवार, १६ जुलै, २०१७

आजपासून राज्यसभा व लोकसभाचे पावसाळी अधिवेशन सुरु १८ विधेयकाचा समावेश - १७ जुलै २०१७

आजपासून राज्यसभा व लोकसभाचे पावसाळी अधिवेशन सुरु १८ विधेयकाचा समावेश - १७ जुलै २०१७

* राज्यसभेचे २४३ वे तर १६ व्या लोकसभेचे १२ वे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारतर्फे नव्याने प्रस्तावित केली जाणारी एकूण १८ विधेयके आहेत.

* याशिवाय लोकसभेत ९ आणि राज्यसभेत जुनी १६ विधेयके अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यावर लक्ष देऊन ती मंजूर करण्याच्या तयारीत सरकार असेल.

[ काही ठळक विधेयके ]

* वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संबंधित २ विधेयके, यातील एक व विधेयक जम्मू काश्मीरमधील जीएसटी अंमलबजावणीसाठी असेल.

* बुडीत कर्जाच्या वसुलीबाबतचे बँकिंग नियमन विधेयक २०१७

* राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना - २०१७

* चंदीगडला जीएसटी दरात सूट देण्याची मुभा देणारे पंजाब नगरपालिका कायदा दुरुस्ती विधेयक - २०१७

* राष्ट्रीय तपास संस्था दुरुस्ती - २०१७

* बेकादेशीर कारवाया कायदा दुरुस्ती - २०१७

* नागरिकत्व कायदा दुरुस्ती - २०१७

* भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा दुरुस्ती - २०१७

* भारतीय व्यवस्थापन संस्था [IIM] - २०१७

* व्हिसल ब्लोअर्स कायदा दुरुस्ती विधेयक - २०१७

* प्राचीन स्थळांची देखभाल - दुरुस्ती विधेयक - २०१७

* मोटार वाहन कायदा - २०१७

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.