मंगळवार, ११ जुलै, २०१७

नायलॉन, सिंथेटिक मांजावर अखेर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली - १२ जुलै २०१७

नायलॉन, सिंथेटिक मांजावर अखेर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली - १२ जुलै २०१७

* राष्ट्रीय हरित लवादा [ NGT ] ने आज नायलॉन आणि सिंथेटिक मांजावर बंदी घातली आहे. या मांजामुळे पक्षी, जनावरे, आणि मानवी जीवनालाही धोका आहे. असे लवादाने म्हटले आहे.

* एनजीटीचे प्रमुख न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने सर्व राज्य सरकारांना पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिंथेटिक मांजा आणि नायलॉनचा दोरा अशा सर्व प्रकारच्या दोऱ्यावर बंदी घातली आहे.

* हा बंदी आदेश नायलॉन, चीनी, आणि शिशाचा वापर करून तयार केलेल्या दोऱ्यावरही लागू असणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याचे निर्देश देण्यात आले आहे.

* पेटा संघटना, खालिद अशर्रफ़ आणि नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेवर हरित लवादाने निर्णय दिला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.