सोमवार, १७ जुलै, २०१७

रॉजर फेडररने जिंकले विम्ब्लडनचे ८ वे विजेतेपद - १७ जुलै २०१७

रॉजर फेडररने जिंकले विम्ब्लडनचे ८ वे विजेतेपद - १७ जुलै २०१७

* लंडन येथे सुरु असलेल्या पुरुष एकेरी स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विक्रम ८वे विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत क्रोएशियाच्या मरीन चिलीचा सरळ सेटमध्ये १ तास ४१ मिनिटात पराभव केला.

* फेडररने आतापर्यंत ११ वेळा अंतिम फेरी गाठून ८ व्यांदा विजेतेपद मिळवले. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदाचा विक्रमही आता फेडररच्या नावावर नोंदला गेला.

* फेडररचे हे त्याच्या कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. फेडररचे वयाच्या ३५ व्या वर्षी विम्ब्लडन विजेतेपद अशी कामगिरी करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

* यापूर्वी १९७६ मध्ये आर्थर ऍश यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी विजेतेपद पटकावले होते. फेडररने एकही सेट न गमावता विम्ब्लडन विजेतेपद पटकावले.

* फेडररचे हे ८ वे विम्ब्लडन तर १९ वे ग्रँडस्लॅम आहे. विली रेनशॉ आणि पिट सॅम्प्रेस यांचा पुरुष एकेरीत सर्वाधिक ७ विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.