गुरुवार, २० जुलै, २०१७

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत अंतिम फेरीत फेरीत दाखल - २१ जुलै २०१७

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत अंतिम फेरीत फेरीत दाखल - २१ जुलै २०१७

* कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढय ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करून, इंग्लंडमधल्या महिला विश्वचषक फायनलमध्ये धडक मारली.

* या उपांत्य सामन्यात नाबाद १७१ धावांची खेळी करणारी हरमनप्रीत कौर भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली.

* भारताने ४२ षटकात ४ बाद २८१ धावांची मजल मारली. परंतु झुंझार फलंदाजीमुळे ऑस्टेलियाचा डाव २४५ धावांची मजल मारता आली.

* भारताच्या दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ फलंदाजांना माघारी पाठवलं. तर झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रमुख २ विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवने प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.

* महिला विश्वचषक अंतिम सामना आता  भारत आणि इंग्लंड सोबत २३ जुलै रविवारी दुपारी ३ वाजता होणार असून सर्व प्रेक्षकांची नजर आता विश्वचषक फायनलच्या सामन्याकडे लागली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.