शुक्रवार, ७ जुलै, २०१७

आशियाई स्पर्धेत महंमद व अजयकुमारला सुवर्णपदक - ८ जुलै २०१७

आशियाई स्पर्धेत महंमद व अजयकुमारला सुवर्णपदक - ८ जुलै २०१७

* भुवनेश्वर येथे चालू असलेल्या कलिंगा स्टेडियमवर भर पावसात ४०० मीटर शर्यतीत महंमद अनसने ४२ तब्बल वर्षानंतर सुवर्णपदक मिळवले.

* तर अजयकुमार सरोजने १५०० मीटर शर्यतीत भारताला २८ वर्षानंतर सुवर्णपदक मिळवून दिले.

* यापूर्वी आशियाई स्पर्धेत भारताच्या इतिहासातील १९७५ च्या सेऊल येथील स्पर्धेत श्रीराम सिंग यांनी एकमेव सुवर्णपदक व पदक जिंकले होते.

* महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत जिसना मॅथ्यू हिने वरिष्ठ गटात वैयक्तिक ब्राँझ पदक जिंकले. महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत केरळच्या पी यु चित्राने पिछाडी करून काढीत सुवर्णपदक पटकावले.

* पुरुषांच्या गोळाफेकीत तेजिंदरपाल सिंगने ११.७७ मीटरवर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.