शुक्रवार, ७ जुलै, २०१७

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड पुरस्कार जाहीर - ८ जुलै २०१७

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड पुरस्कार जाहीर - ८ जुलै २०१७

* रियो ऑलिम्पिकमधली भारताची रौप्यविजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

* स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड या नियतकालिकांचा क्रीडा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला. पी व्ही सिंधू ही सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराची मानकरी ठरली.

* सिंधूचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही यंदाचे सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे सिंधू हिच्या हस्तेच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* यंदाच्या सर्वोत्तम संघासाठीचा पुरस्कार हा भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने पटकावला. या सोहळ्यात आजी माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि कार्यकर्ते असे मिळून १२ जणांना पुरस्कार देण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.