मंगळवार, १८ जुलै, २०१७

पंजाबराव कृषी विद्यापीठ देशात ४८ व्या क्रमांकावर - १९ जुलै २०१७

महाराष्ट्रातील पंजाबराव कृषी विद्यापीठ देशात ४८ व्या क्रमांकावर - १९ जुलै २०१७

* भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने जारी केलेल्या एका अहवालानुसार देशातील एकूण ५७ कृषी संस्थापैकी विदर्भातील अकोला येथील पंजाबराब देशमुख कृषी विद्यापीठ ४८ व्या क्रमांकावर तर परभणीचे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ ५० व्या क्रमांकावर आहेत.

* भारतातील राष्ट्रीय दुग्ध अनुसंधान संस्था कर्नल प्रथम स्थानावर आहे. राज्यातील कोकण कृषी विद्यापीठ त्यातल्या त्यात बरे म्हणजे ३३ व्या क्रमांकावर आहे.

* महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ १६ व्या क्रमांकावर तर मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे शैक्षणिक संस्था ३५ व्या क्रमांकावर आहे.

* यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांचा खालावलेला दर्जा हा राज्यातील शेतीसाठी चिंताजनक विषय असून शासनाने ही बाब गंभीरतेने घेतली पाहिजे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.