सोमवार, २४ जुलै, २०१७

भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार - २५ जुलै २०१७

भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार - २५ जुलै २०१७

* भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार असून भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती केहर हे कोविंद यांना शपथ देतील.

* त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती आपल्या आसनांची अदलाबदल करतील. नियमाप्रमाणे आसन बदल होताना काही मिनिटासाठी न्या केहर हे राष्ट्रपती समजले जातील.

* शपथ ग्रहण केल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण होईल. त्यानंतर मुखर्जी कोविंद यांच्याबरोबर आपल्या निवासस्थानी म्हणजे १० राजाजी मार्ग येथे पोहोचतील. तिथे अर्थमंत्री अरुण जेटली त्यांचे स्वागत करतील.

* त्यानंतर सैन्य दलाचे तिन्ही दल कोविंद यांना त्यांच्या जुन्या घरी नेतील. त्यांना बग्गीतून राष्ट्रपती भवनापर्यंत नेले जाईल. तेथील प्रांगणात लष्कराच्या तिन्ही दलाकडून [ गार्ड ऑफ ऑनर ] दिले जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.