बुधवार, १९ जुलै, २०१७

विम्बल्डन २०१७ स्पर्धा विजेत्यांची यादी - २० जुलै २०१७

विम्बल्डन २०१७ स्पर्धा विजेत्यांची यादी - २० जुलै २०१७

[ मिश्र दुहेरी विम्बल्डन २०१७ स्पर्धा ]

* स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस आणि ब्रिटनचा जेमी मरे या अव्वल मानांकित जोडीने विम्ब्लडन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

* त्यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात हीथर वॉटसन [ ब्रिटन ] व हेन्री कोन्टिनोन्ट [ फिनलॅंड ] या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभाव केला.

[ पुरुष दुहेरी विम्बल्डन २०१७ स्पर्धा ]

* पोलंडच्या लुकास कुबोट आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या जोडीने रोमांचक बाजी मारत विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

* कुबोट मेलो यांनी ऑलिव्हर मराच [ ऑस्ट्रिया ] व मेट पावीच [ क्रोएशिया ] या जोडीचे कडवे आव्हाहन आहे ५-७,७-५,७-६,३-६,१३-११, या फरकाने विजेतेपद पटकावले.

[ महिला दुहेरी विम्बल्डन २०१७ स्पर्धा ]

* एकाटेरीना माकारोव्हा आणि एलेना व्हेसनींना या रशियन ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या जोडीने महिला दुहेरीच्या विजेतेपदाचा गवसणी घातली.

* महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात माकारोव्हा - व्हेसनीना जोडीने चिंग चान [ तैवान ] व मोनिका निकोल्सकू [ रोमानिया ] यांचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवत विजतेपद पटकावले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.