सोमवार, ३ जुलै, २०१७

फुटबॉल कॉन्फडरेशन चषक जर्मनीने जिंकला - ४ जुलै २०१७

फुटबॉल कॉन्फडरेशन चषक जर्मनीने जिंकला - ४ जुलै २०१७

* विश्वविजेत्या जर्मनीने फुटबॉल जगतावरील आपली हुकूमत पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. २०१४ साली झालेल्या फिफा विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीने आज झालेल्या अंतिम लढतीत विजय संपादित करून कॉन्फडरेशन चषक जिंकला.

* अंतिम लढतीत चिलीचा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत २० व्या मिनिटाला स्टॅन्डलने केलेला एकमेव गोल जर्मनीच्या विजयात निर्णायक ठरला.

* आजच्या विजेतेपदाबरोबरच फुटबॉलमध्ये विश्वचषक आणि कॉन्फडरेशन चषक अशा दोन स्पर्धा जिंकणारा जर्मनी हा फ्रान्स आणि ब्राझील यांच्यानंतरचा ३ रा संघ ठरला आहे.

* तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पोर्तुगालने मेक्सिकोबरोबर २-१ ने मात करत ३ रे स्थान पटकावले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.