रविवार, २ जुलै, २०१७

शून्य धावत चार विकेट घेऊन निएकर्क विश्वविक्रम - ३ जुलै २०१७

शून्य धावत चार विकेट घेऊन निएकर्क विश्वविक्रम - ३ जुलै २०१७

* महिला विश्वचषक लंडन येथे चालू असलेल्या रविवारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्क हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शून्य धावात ४ गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. 

* महिला आणि पुरुष एकदिवसीय क्रिकेट जगात असा विक्रम करणारी ती पहिली महिला खेळाडू बनली आहे. 

* तिने ३.२ ओव्हर मध्ये ३ ओव्हर मेडन तर एकही धाव काढू न देता ४ विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या या कामगिरीने वेस्ट इंडिजचा डाव २५ षटकात आटोपला. 

* यापूर्वी क्रिकेटमध्ये ३ महिला, आणि एका पुरुष खेळाडूने शून्य धावात ३ गडी बाद केले आहे. त्यात महिला - ऑल्व्हिया मॅगलो, संदामली डोलावट्टे, अरेंन ब्रिन्दाल, तर पुरुष गटात रिची बेनॉ या एकमेव पुरुष खेळाडूचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.