शनिवार, १ जुलै, २०१७

कर्नाटक सरकारची इंदिरा कँटिंग नावाची योजना - २ जुलै २०१७

कर्नाटक सरकारची इंदिरा कँटिंग नावाची योजना - २ जुलै २०१७

* १ रुपयांमध्ये इडली, तर ५ रुपयांमध्ये सांभार - भात ही अम्मा कँटिंग योजना तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांना पुन्हा सत्ता मिळवून देण्यात यशस्वी झाली आहे.

* कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यावर ठेवून कर्नाटक सरकारने १० रुपयात जेवण आणि ५ रुपयात न्याहारी देण्याची [ इंदिरा कँटीन ] नावाची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

* आंध्र प्रदेशात १९८२ मध्ये तेलगू देसमचे एन टी रामराव यांनी २ रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी निवडणुका जिंकल्या.

* रामाराव आणि जयललिता यांना मिळालेल्या यशाचे उदाहरण डोळ्यासमोर असल्याने काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारने स्वस्तात पदार्थ देण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

* येत्या १५ ऑगस्टपासून बंगलोर शहरात १९८ प्रभागामध्ये ही योजना राबविली जाणार आहे. योजना यशस्वी झाल्यावर ही सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.