बुधवार, १२ जुलै, २०१७

जगात दूध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर - १२ जुलै २०१७

जगात दूध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर - १२ जुलै २०१७

* संयुक्त राष्ट्रसंघ व आर्थिक सहकार्य व विकास परिषद [ OECD ] यांनी २०१७-२०१६ आऊटलूक असा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात भारत जगात दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.

* भारत जगात २०२६ पर्यंत सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश राहणार आहे. २१ व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत भारतातील दूध उत्पादन जवळजवळ तिपटीने वाढणार आहे.

* अहवालाच्या कालमर्यादेत भारतातील दूध उत्पादनात ४९ टक्क्यांनी वाढ करून होऊन २०२६ मध्ये जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश होईल. दुसऱ्या क्रमांकावर युरोपीय समुदाय असेल.

* जगातील दूध उत्पादक प्रथम दहा देश - भारत, अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्राझील, जर्मनी, रशिया, फ्रान्स, न्यूझीलंड, तुर्कस्तान.

* भारतातील दूध उत्पादक प्रथम दहा राज्य - उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, हरियाना, बिहार, तामिळनाडू.

[ अहवालातील अन्य मुद्दे ]

* भारतात गव्हाचे उत्पादही वाढणार आहे. २०१७-१६ या काळात जगात गहू उत्पादन ११ टक्कयांनी वाढण्याची शक्यता आहे. गहू पिकवणाऱ्या प्रदेशामध्ये केवळ १.८% एवढीच वाढ होईल.

* आशिया व प्रशांत महासागराच्या प्रदेशामध्ये सर्वाधिक गहू उत्पादित केला जाणार आहे. जगाच्या ४६% गव्हाचे जास्तीचे उत्पादन केला जाईल.

* भारतातील उत्पादनात १५ टन वाढ होईल. त्यानंतर पाकिस्तान ६ टन, चीन ५.५ टन, या देशातील वाढ उल्लेखनीय असेल.

* अहवालात तांदूळ उत्पादन संबंधी उल्लेख केला आहे. त्यानुसार युरोपीय समुदायात आगामी दशकात १३% उत्पादनवाढीचा शक्यता आहे.

* तांदुळाच्या उत्पादनात ६६ टन वाढ होणार असून, ती नेहमीच्या उत्पादनापेक्षा ९३% जास्त असेल. मात्र जगभरातील भाताखालील शेत जमिनीत एक टक्काच वाढ होणार आहे.

* भारत, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड, व व्हिएतनाम हे देश सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारे ठरणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.