मंगळवार, ४ जुलै, २०१७

पंतप्रधान आवास योजनेचे नियोजन करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर - ५ जुलै २०१७

पंतप्रधान आवास योजनेचे नियोजन करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर - ५ जुलै २०१७

* केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचे नियोजन करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली आहे.

* केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन व नगरविकास विभाग यांच्यातर्फे राज्य शासनाला मंगळवारी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्टया दुर्बल, व अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घरांचे नियोजन करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

* केंद्रीय व गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन विभागाचे राज्यमंत्री राव इंदरजित सिंह यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

* राज्य शासनाच्या म्हाडा [ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास ] चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी स्वीकारला. तसेच म्हाडा आणि विविध मंडळामार्फत महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या सुमारे ४० हजार सदनिकांच्या बांधकामांचा शुभारंभदेखील करण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.