गुरुवार, २० जुलै, २०१७

जागतिक गणिती मरियम मिर्झाखानी यांचे निधन - २१ जुलै २०१७

जागतिक गणिती मरियम मिर्झाखानी यांचे निधन - २१ जुलै २०१७

* फिल्ड्स मेडल हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला व प्रसिद्ध इराणी - अमेरिकन गणिती मरियम मिर्झाखानी यांचे निधन झाले.

* स्टॅनफर्ड विद्यापिठात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.त्यांचे वयाच्या ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.

* मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. हॉवर्ड विद्यापिठाने २००४ मध्ये त्यांना पीएचडी प्रदान केली आहे.

* त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ऑलंम्पियाडमध्ये गौरवण्यात आले. १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिर्झाखानी यांना गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

* भौमितिक व गणिती प्रणालीच्या संशोधनासाठी कोरियात सेऊल येथे झालेल्या इंटरनॅशनल काँगेस ऑफ मॅथेमॅटिशियन्स या अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.