रविवार, २ जुलै, २०१७

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन - ३ जुलै २०१७

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन - ३ जुलै २०१७

* मराठी रंगभूमीवर [ मामा ] म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. तोरडमल यांचा [ तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकातील प्राध्यापक बारटक्के नाट्यरसिकांच्या लक्षात राहिला.

* या नाटकाने रेकॉर्डब्रेक अशा ५ हजार प्रयोगाचा टप्पा ओलांडल्याने तोरडमलचा प्राध्यापक बारटक्के प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला.

* स्वतःच्या मूत्रपिंडाच्या विकाराने ते काही काळापासून त्रस्त होते. ते ८४ वर्षाचे होते. तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, चांदणे शिंपीत जाती, बेईमान, अखेरचा सवाल, चाफा बोलेना, संगीत मत्स्यगंधा, अशा प्रसिद्ध नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमी गाजविली.

* नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अनुवादक, नाट्यनिर्माता, असा त्यांनी लीलया संचार केला. त्यांनी अगॉस्थ ख्रिस्तीच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवादही केला आहे.

* त्यांनी र धो कर्वे यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले. तिसरी घंटा [ आत्मचरित्र], आयुष्य पेलताना [ रूपांतरित कादंबरी], एक सम्राज्ञी एक सम्राट अशी चरित्रात्मक लेखन संपदा त्यांच्या नावावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.