गुरुवार, १३ जुलै, २०१७

ओनजीसी आणि एचपीसीएल कंपन्यांचे वर्षअखेर विलीनीकरण - १४ जुलै २०१७

ओनजीसी आणि एचपीसीएल कंपन्यांचे वर्षअखेर विलीनीकरण - १४ जुलै २०१७

* ऑइल अँड नॅचरल गॅस [ ONGC ] आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [ HPCL ] या दोन सरकारी कंपन्यांचे चालू वित्त अखेरपर्यंत विलीनीकरण होणार आहे. असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

* २०१७-१८ च्या वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होईल. या एकीकरणानंतर ४० अब्ज डॉलर मूल्य असलेली नवी कंपनी अस्तित्वात येईल.

* सध्या HPCL चे बाजार भांडवल ५१,७६४,२५ कोटी रुपयांचे आहे. सरकारी मालकीचा सर्व ५१.११% हिस्सा खरेदी करण्यासाठी ONGC ला २६,४५० कोटी रुपये भरावे लागतील.

* यानंतर ONGC च्या वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमतेत २३.८ दशलक्ष टनांची भर पडेल. ONGC ही भारतातील ३ ऱ्या क्रमांकाची तेल शुद्धीकरण कंपनी बनेल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.