रविवार, २३ जुलै, २०१७

इस्रोचे माजी अध्यक्ष यु आर राव यांचे निधन - २४ जुलै २०१७

इस्रोचे माजी अध्यक्ष यु आर राव यांचे निधन - २४ जुलै २०१७

* इस्रोचे माजी अध्यक्ष प्रोफेसर यु आर राव [ उडुपी रामचंद्र राव ] यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.

* राव यांनी १९७२ साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदार घेतली आहे. उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अडमरु या खेडेगावात झाला.

* त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूरमध्ये पूर्ण झाला. त्यानंतर मद्रासला पदवीचे शिक्षण तर बनारस हिंदू विद्यापिठातून पदव्युत्तर शिक्षण तर गुजरात विद्यापिठातून त्यांनी पीएच डी चे शिक्षण घेतले.

* अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सस विद्यापिठात अध्यापन केले. १९६६ मध्ये परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटीत ते संशोधन करू लागले.

[ यु आर राव यांची कार्ये ]

* राव यांचा आंतरराष्ट्रीय ऍस्ट्रोनॉटिकल फेडरेशन येथे प्रतिष्टीत द २०१६ आईएएफ हॉल ऑफ फेम मध्ये समावेश.

* राव यांच्या मार्गदर्शनात १९७५ मध्ये पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्टपासून २० हुन अधिक उपग्रहाच डिझाईन तयार करण्यात आले. उपग्रहाची निर्मिती करण्यात आली.

* २०१३ मध्ये वॉशिंग्टन येथे सॅटेलाईट हॉल ऑफ फेम द सोसायटी ऑफ सॅटेलाईट प्रोफेशनल इंटरनॅशनल या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.

* १९८४ ते १९९४ या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले आहे. १० वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.

* आर्यभट्ट नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अँपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणीचे किमान २० उपग्रह तयात करण्यात आले.

* त्यांना १९७६ साली पदमभूषण आणि २०१७ मढये पदमविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.