शनिवार, २९ जुलै, २०१७

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा राजीनामा - २९ जुलै २०१७

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा राजीनामा - २९ जुलै २०१७

* पाकिस्तानच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा पंतप्रधानांना पदासाठी अपात्र ठरविले आहे.

[ नवाज शरीफ प्रकरण ]

* पनामातील मोझॅक फोन्सेका या कंपनीने पनामा पेपर्स या नावाने एक अहवाल प्रसिद्ध करत त्यामध्ये विदेशामध्ये बेहिशेबी मालमत्ता जमविलेल्या जगभरातील नेत्यांची आणि उद्योगपतींची नावे जाहीर केली आहे.

* या यादीमध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लाडिनीर पुतीन आणि इतर अनेक नेत्यांसह पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबियांचे नाव होते.

* शरीफ यांनी नव्व्दच्या दशकात काळा पैसा साठवून लंडन आणि इतर काही शहरामध्ये मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला.

* यामुळे पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी लावून धरली. पाकिस्तान मधील सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरला या प्रकरणाच्या सुनावणीस सुरवात केली.

* या सर्व कारणाने त्यांना लष्कराचे बंड, न्यायालयांचे आदेश, पक्षातून हकालपट्टी अथवा हत्या या कारणामुळे पंतप्रधानांना कार्यकाळ कायम अपूर्णच राहिला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.