गुरुवार, ६ जुलै, २०१७

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याना अडीच लाख अनुदान देण्याचा सरकारचा विचार - ६ जुलै २०१७

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याना अडीच लाख अनुदान देण्याचा सरकारचा विचार - ६ जुलै २०१७

* भारतीय समाजातील उच्चनिचतेवर आधारलेली जातीव्यवस्था नष्ट करण्याचा एक प्रभावी व दूरगामी उपाय म्हणून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. 

* त्याचाच एक भाग म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याना अडीच लाख रुपयाचे अनुदान देण्याचा विचार आहे. अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री सुरजकुमार बडोले यांनी दिली. 

* केवळ जातीजातीमधीलच नाही तर धर्माधर्मातील भेद, द्वेष, मत्सर, कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाहाबरोबरच आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार खास कायदा करणार आहे. 

* हा मसुदा लोकांसमोर मांडून त्यावर हरकती सूचना मागवून, त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. असे त्यांनी सांगितले. 

* येत्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशनात आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह कायद्याचे विधेयक मांडण्याचा सामाजिक न्याय विभागाचा प्रयत्न आहे. 

* सरकारच्या वतीने सध्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५० हजार रुपये, प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. ते फारच कमी आहे. 

* महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान व मध्यप्रदेशात आंतरजातीय विवाहासाठी २ लाख रुपये अनुदान दिले जाते. 

* गोव्यामध्ये अनुसूचित जातींची संख्या केवळ १.७% आहे. त्या राज्यातही आंतरजातीय विवाहासाठी १ लाख रुपये अनुदान दिले जाते. 

* राज्यात जातीनिर्मूलनाच्या चळवळीला हातभार म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.