मंगळवार, २५ जुलै, २०१७

नॅशनल सुपर कॉम्पुटर मिशन - २६ जुलै २०१७

नॅशनल सुपर कॉम्पुटर मिशन - २६ जुलै २०१७

* मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत आता सूपर कॉम्पुटर भारतात तयार होणार आहेत. 

* नॅशनल सुपर कॉम्पुटर मिशन अंतर्गत या देशी सुपर कॉम्पुटरच्या निर्मितीचे काम पुण्यातील सिडॅककडे सोपविण्यात येत आहे. 

* ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेला गेल्या वर्षी मार्चमध्ये मंत्रिमंडळाच्या अर्थ समितीने मान्यता दिली होती. 

* यानुसार योजनेअंतर्गत तीन टप्प्यामध्ये ५० सुपर कॉम्पुटरची निर्मिती करण्याचे ध्येय आहे. हे सुपर कॉम्पुटर परमपेक्षा जास्त वेगवान असतील. 

* सुरवातीच्या टप्प्यामध्ये हायस्पीड इंटरनेट स्विच आणि कॉम्पुटर यासारख्या उपकरणांची भारतात डिझाईन आणि निर्मिती करण्यात येणार आहे. 

* या सुपरकॉम्पुटरचा आराखडा, त्यासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांची निर्मिती आणि ते जोडण्याचे काम सीडॅक करणार आहे. 

* सुपर कॉम्पुटरच्या या योजनेवर विज्ञान आणि प्रौद्योगिक मंत्रालयाचे वरिष्ठ वैज्ञानिक मिलिंद कुलकर्णी लक्ष ठेवतील. 

* हे सुपर कॉम्पुटर देशभरातील विविध वैज्ञानिक संस्थांना देण्याचा सरकारचा मानस आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.