गुरुवार, १३ जुलै, २०१७

स्टेट बँकेच्या व्यवहार शुल्कात मोठे फेरबदल - १४ जुलै २०१७

स्टेट बँकेच्या व्यवहार शुल्कात मोठे फेरबदल - १४ जुलै २०१७

* स्टेट बँकेने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्स्फर [ NEFT ] आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट [ RTGS ] व्यवहारावरहील शुल्क कमी केले आहे.

* आता मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगवरून होणाऱ्या [ NEFT ] व [ RTGS ] व्यवहारावरहील शुल्कात ७५% पर्यंत कपात करण्यात आली आहे. हा बदल येत्या १५ जुलैपासून लागू केला जाईल.

* [ NEFT ] च्या १०००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी २ रुपयाएवजी १ रुपया, तर १०,००१ ते १,००००० रुपयांच्या व्यवहारासाठी ४ रुपयाएवजी २ रुपये, १,००००० ते २,००००० रुपयाच्या व्यवहारासाठी १२ रुपयाएवजी केवळ ३ रुपये शुल्क, त्यापेक्षा जास्त रकमेवर २० रुपयाएवजी ५ रुपये शुल्क आकारण्यात येईल.

* [ RTGS ] च्या २ ते ५ लाख रुपयाच्या व्यवहारासाठी ५ रुपये, ५ लाख ते अधिकच्या रकमेसाठी ४० रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.