रविवार, १६ जुलै, २०१७

हरिंदर पाल सिंधूने जिंकली व्हीकटोरिया ओपन स्क्वॉश स्पर्धा - १७ जुलै २०१७

हरिंदर पाल  सिंधूने जिंकली व्हीकटोरिया ओपन स्क्वॉश स्पर्धा - १७ जुलै २०१७

* भारताच्या हरिंदर संधूने आपली विजय कायम राखत दोन आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. 

* हरिंदरने ७७ मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात अग्रमानांकनात लाभलेल्या रेक्स हॅड्रिकचा १२-१४, ११-३, ११-४, ११-७ असा पराभव केला. आणि मेलबर्न येथे हरिंदर पाल ने व्हीकटोरिया ओपन स्क्वॉश स्पर्धा जिंकली. 

* २८ वर्षीय संधूंचे यंदाच्या वर्षातील हे चौथे विजेतेपद आहे. या वर्षी मे महिन्यात मोसमाला मलेशियन स्पर्धेतून सुरुवात झाल्यापासून हरपाल सलग १७ सामने जिंकला आहे. 

* त्याने गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया ओपन विजेतेपद जिंकले. तसेच फिलिपाइन्स ओपन स्पर्धाही जिंकली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.