सोमवार, २४ जुलै, २०१७

जागतिक अपंग अँथलेटिक स्पर्धेत शरदला रौप्य तर वरुणला ब्राँझपदक - २४ जुलै २०१७

जागतिक अपंग अँथलेटिक स्पर्धेत शरदला रौप्य तर वरुणला ब्राँझपदक - २४ जुलै २०१७ 

* इंग्लंड येथे लंडन शहरात जागतिक अपंग अँथलेटिक चॅम्पियन २०१७ स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. 

* स्पर्धेच्या टी -४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य तर वरून भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली आहे. 

* शरद कुमारने सर्वोच्च कामगिरी करत १.८४ मीटर उडी मारली. सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमेरिकेच्या सॅम ग्वेपेक्षा त्याची उडी फक्त दशांश दान मीटरने कमी पडली. 

* वरुणने देखील १.७७ मीटर उडी मारताना ब्राँझपदकाची कमाई केली. रौप्य कामगिरीनंतर शरद म्हणाला मी येथे सुवर्णपदक मिळविण्यासाठी आलो होतो. पण रौप्य पदक मिळाले तरी समाधानी आहे. 

* भारताने आता पर्यंत या स्पर्धेत एकूण ५ पदके मिळविली आहे. सरदारसिंग गुर्जर याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना भारताचे खाते उघडले. 

* त्यांनतर २ दिवसांनी अमित सरोहने क्लब एफ ५१ प्रकारात कमलज्योति दलाल हिने ब्राँझपदकाची कमाई केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.