गुरुवार, ६ जुलै, २०१७

आगामी दशकात जागतिक अर्थव्यस्थेचा केंद्रबिंदू भारत असेल हॉवर्ड युनिव्हर्सिटी अहवाल - ७ जुलै २०१७

आगामी दशकात जागतिक अर्थव्यस्थेचा केंद्रबिंदू भारत असेल हॉवर्ड युनिव्हर्सिटी अहवाल - ७ जुलै २०१७

* आगामी काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू भारत असेल. आगामी दहा वर्षात भारत चीनला मागे टाकत ७.७ टक्के दराने प्रगती करत राहील. असा अंदाज हावर्ड विद्यापीठाच्या अहवालात केला आहे.

* हॉवर्ड युनिव्हर्सिटी कडून याबाबत संशोधनातून तयार केलेल्या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.

[ अहवालातील विशेष मुद्दे ]

* भारत आणि युगांडा हे जगात वेगाने आर्थिक विकास करणारे प्रमुख देश असल्याचे समोर आले आहे. येत्या दहा वर्षात भारतासह युगांडाही ७.७% वृद्धीदरासह आर्थिक विकास करेल.

* जगात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे पहिले जात आहे. आगामी दशकात भारत वैश्विक आर्थिक घडामोडींचा मुख्य केंद्रबिंदु बनेल.

* चीन मंदीचा दूत - चीनचा खर्च आणि उत्पन्न यामधील दरी वाढली आहे. आगामी दशकामध्ये चीनची अर्थव्यवस्था ४.४ विकासदराने कामगिरी करेल.

* संथ गतीच्या अर्थविकासामुळे चीन आता मंदीचा दूत असे या अहवालात नमूद केले आहे.

* भारताच्या निर्यातीत विविधता - भारताने आपल्या निर्यातीत विविधतेवर भर दिला आहे. रसायने, वाहने, आणि इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार चीनच्या निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे.

* हा अहवाल हॉवर्ड युनिव्हर्सिटी मधील आर्थिक वृध्दीसंदर्भात आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने [ सीआयडी ] ने याबाबत संशोधन केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.