मंगळवार, ४ जुलै, २०१७

फ्रान्समध्ये संसदीय निवडणुकीत एकूण ५७७ जागांपैकी २३३ जागा जिंकून नवा विक्रम - ५ जुलै २०१७

फ्रान्समध्ये संसदीय निवडणुकीत एकूण ५७७ जागांपैकी २३३ जागा जिंकून नवा विक्रम - ५ जुलै २०१७

* नुकत्याच झालेल्या फ्रान्समध्ये संसदीय निवडणुकीत एकूण ५७७ जागांपैकी २३३ जागा जिंकून नवा विक्रम या देशात घडला तो म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या क्रमवारीत सर्वाधिक महिला खासदाराच्या देशात तो ६४ वरून एकदम १७ व्या स्थानावर पोहोचला.

* या निवडणुकीत या महिला क्रांतीचे श्रेय फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांचे अभिनंदन केले पाहिजे. यंदा फ्रान्सची निवडणूक हि स्त्री - पुरुष समानतेच्या मुद्यावर लढण्यात आली.

* फ्रान्स देशात राजकीय पक्षांना ४९% महिलांना उमेदवारी दिली नाहीतर त्यांचे फंडिंग रोखण्यात येईल. तरीही बहुतांश पक्षांनी पुरुषावरच विश्वास ठेवला.

* केवळ मॅक्रोन यांच्या रिपब्लिक एन मार्श यांच्या पक्षाने संसदीय निवडणुकीत ५०% महिलांना तिकीट दिले. तर निवडणुकीत चक्क ५७७ पैकी २३३ जागा महिलांनी पटकावल्या आहेत. व २२ पैकी ११ महिला मंत्री झाल्या.

* भारताचा यासंदर्भात विचार केल्यास या देशात ५०% महिला आहेत. व १६ लोकसभेत केवळ ६२ महिला खासदार म्हणून निवडून आल्या. त्या एकूण सदस्यांच्या ११% आहेत.

* संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक क्रमवारीत आपण १४९ व्या क्रमांकावर आहोत. तर जगातील मागासलेले देश रवांडा या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्या देशात ८० सदस्यांमध्ये ५१ महिला सदस्य आहेत.

* यावरून आपल्या लक्षात आले असेल की संसदेत महिलांचे प्रतिनिधी, त्यांचे सबलीकरण यावर फक्त गप्पा मारायच्या प्रत्यक्ष वेळ आली की पाऊल मागे घ्यायचे.

* राजकीय पक्षांचे धोरण बदलल्याशिवाय सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशात संसदेत महिलांना सन्मान व समान प्रतिनिधित्व मिळणार नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.