शनिवार, १५ जुलै, २०१७

राज्यात राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय - १६ जुलै २०१७

राज्यात राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय - १६ जुलै २०१७

* मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आबालवृद्धांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्द करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

* या मंडळांतर्गत होणाऱ्या परीक्षांना नियमितपणे घेण्यात येणाऱ्या ५ वी ते ८ वी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षांना नियमितपणे घेण्यात येणाऱ्या ५ वी, ८ वी, आणि १२ वी इयत्तेच्या समकक्ष असेल.

* या मंडळाच्या माध्यमातून औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती लागू केली जाणार आहे. मुलामुलींसह शिक्षण घेऊ इच्छिणारे प्रौढ व्यक्ती गृहिणी कामगार या सर्वाना शिक्षणाची संधी उपलब्द करून दिली जाईल.

* त्यात सोयीनुसार अध्ययनाची सवलत असेल. अभ्यासक्रमात लवचिकता राहील व्यवसायिक शिक्षण दिले जाईल. दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असेल.

* इयत्ता ५ वी च्या समकक्ष शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे वय किमान १० वर्षे असावे. पूर्वी औपचारिक शाळेत गेला असेल तर तेथील शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. जर शाळेत गेलाच नसेल तर स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे लागेल.

[ अटी व नियम ]

* इयत्ता ८ वी समकक्ष शिक्षणासाठीचे वय किमान १३ वर्षाचे राहील. तर कमाल वयाला मर्यादा नसेल.

* इयत्ता १० वी साठी १५ वर्षे, किमान ५ वी इयत्ता उत्तीर्ण, महाराष्ट्रात २ वर्षे वास्तव्य पाहिजे. बारावीसाठी किमान वय १७ वर्षे असावे.

* सर्व अभ्यासक्रम हे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ निश्चित करेल. कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम त्यात समाविष्ट असतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.