गुरुवार, २७ जुलै, २०१७

महिला व बालविकास मंत्रालयाचे शी - बॉक्स पोर्टल - २७ जुलै २०१७

महिला व बालविकास मंत्रालयाचे शी - बॉक्स पोर्टल - २७ जुलै २०१७

* नोकरीच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ होत असल्यास त्याच्या तक्रारी करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने [ शी - बॉक्स ] हे पोर्टल सुरु केले.

* या पोर्टलवर केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना लैंगिक छळ होत असल्यास तक्रारी करता येतील.

* लवकरच यात खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांत असलेल्या महिलांनाही समाविष्ट केले जाईल असे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी जाहीर केले.

* याशिवाय नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाण किती आहे. याची देशव्यापी पाहणी करण्यात येणार आहे.

* लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी ऑनलाईन मंच उपलब्द करून देण्याची घोषणा गेल्या ऑकटोम्बरमध्ये करण्यात आली होती.

* सद्यस्थितीला नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक गुन्ह्याची नोंद घेण्याची कुठलीही केंद्रीभूत व्यवस्था नाही.

* राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४ पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर गुन्ह्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

* २०१५ च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात दाखल झाले. त्यात ७१ लोकांवर आरोपपत्रे ठेवण्यात आली. तर एकूण ५ जणांना शिक्षा झाली.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.