सोमवार, १७ जुलै, २०१७

देशाच्या मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणामात्मक [ २०१७-२२ ] योजना जाहीर -१८ जुलै २०१७

देशाच्या मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणामात्मक [ २०१७-२२ ] योजना जाहीर -१८ जुलै २०१७

* केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जय प्रकाश नड्डा यांनी मलेरियाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना जाहीर केली आहे.

* ईशान्य भारतातील यशस्वी मोहिमेनंतर आता झारखंड, ओडिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्र या राज्यावर लक्ष केंद्रित केले गेले.

* योजनेमध्ये आगामी ५ वर्षासाठी देशाच्या विभिन्न भागामध्ये मलेरियाच्या स्थितीनुसार त्याच्या निर्मूलनाचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.

* योजनेअंतर्गत मलेरियाची निगराणी, जलद निदान, प्रक्रियेची स्थापना आणि मलेरियाचा फैलाव रोखणे, मच्छरदानीचा वापराची जाहिरात, घरगुती स्प्रेचा वापर आणि प्रभावी कार्यासाठी मनुष्यबळ व क्षमतेचा प्रभावी वापर अशा बाबीचा समावेश करण्यात येईल.

* मलेरिया हा प्लाझमोडियम प्रकाराशी संबंधित परजीवी प्रोटोझुवा द्वारे मानवाना आणि इतर प्राण्यांना मच्छरांमुळे होणारा एक संक्रामक रोग आहे.

* सामान्यतः संसर्गजन्य मादी ऍनाफिलिस मच्छरांमुळे हा रोग पसरतो. जागतिक स्तरात भारत हा तिसरा सर्वाधिक प्रमाणात मलेरियाने ग्रसित देश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.