शनिवार, १५ जुलै, २०१७

भारतीय रेल्वने सादर केले नवे रेल सारथी अँप - १६ जुलै २०१७

भारतीय रेल्वने सादर केले नवे रेल सारथी अँप - १६ जुलै २०१७

* रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल [ रेल सारथी ] हे ऍप लॉन्च केले. रेल्वेसंबंधी सर्व सुविधा प्रवाशांना आता एकत्रितपणे या अँप मध्ये मिळणार आहेत.

[ ऍपचे वैशिष्ट्ये व फायदे ]

* या ऍप द्वारे तुम्ही तिकीट बुकिंगपासून ते कॅटरिंग आणि तक्रारीपर्यंत सर्व सेवांचा लाभ एकाच क्लिकवर घेऊ शकता.

* तिकीट बुकिंग, कुली बुकिंग, विश्रामगृह आरक्षण, व्हील चेअर बुकिंग, ऑन बोर्ड क्लीन, क्लीन माय कोच, रिअल टाइम लोकेशन, हॉटेल बुकिंग, टॅक्सी बुकिंग, विमान तिकीट बुकिंग, तक्रार व सल्ला, १३९ चौकशी, १३८ तक्रार, १८३ सुरक्षा या सर्व सुविधा एकाच या ऍप मध्ये मिळतील.

* रेल्वेचे सर्व ऍप आणि वेबसाईट यांचं एकत्रीकरण करून इंटिग्रेटेड ऍप बनविण्यात आले. हे ऍप प्ले स्टोअर वर मोफत उपलब्द आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.