सोमवार, २४ जुलै, २०१७

शिवाजीराव पाटील यांचे निधन - २५ जुलै २०१७

शिवाजीराव पाटील यांचे निधन - २५ जुलै २०१७

* माजी मंत्री आणि शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पदमभूषण शिवाजीराव गिरधर पाटील वय [९२] यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील होते.

* शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी तालुका अमळनेर, जि - जळगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते.

* ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वाहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला.

* स्वातंत्र्यानंतर ते प्रज्ञा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले.

* शिरपूर तालुक्याचे २ वेळा आमदार, वीज, पाटबंधारे, व राजशिष्टाचार, राज्यमंत्री, सहकारमंत्री, राज्यसभा मंत्री, अशी विविध पदे भूषविली.

* १९८२ मध्ये त्यांनी शिरपूर साखर कारखान्याची स्थापना केली. ते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्गीय सल्लागार म्हणून ओळखले जायचे. पदमभूषण पुरस्काराने त्यांना भूषविण्यात आले.

* १२ वर्षे मंत्रिपद भूषविलेले शिवाजीराव पाटील १९६० ते १९६७ या काळात विधानपरिषदेचे सदस्य होते. १९६७ ते १९८० या काळात ते विधानसभेवर निवडून गेले होते. १९९२ ते १९९८ या काळात ते राज्यसभेवरही गेले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.