बुधवार, २६ जुलै, २०१७

भारत २०२१ मध्ये विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे पद भूषविणार - २६ जुलै २०१७

भारत २०२१ मध्ये विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे पद भूषविणार - २६ जुलै २०१७

* भारत पुढील वर्षी महिला विश्व चॅम्पियनशिप व्यतिरिक्त २०२१ मध्ये प्रथमच पुरुषाच्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद स्वीकारणार आहे.

* आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने [ AIBA ] मॉस्कोने आपल्या कार्यकारी समितीच्या २ दिवसांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

* आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने [ AIBA ] कार्यकारी समितीने २०१९ च्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद तुर्कीतील ट्रबजोनला बहाल केले आहे.

* भारताने यापूर्वी कधीच विश्व चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविलेले नाही. पण २००६ मध्ये महिला चॅम्पियनशिपचे आयोजन केलेले आहे.

* भारताने यापूर्वी पुरुष बॉक्सिंगमध्ये १९९० मध्ये मुंबईत विश्वकप व २०१० मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल चॅम्पियनशिप या प्रमुख स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.