रविवार, २ जुलै, २०१७

भारतात शिक्षणावर सरासरी १२ लाख रुपये खर्च - ३ जुलै २०१७

भारतात शिक्षणावर सरासरी १२ लाख रुपये खर्च - ३ जुलै २०१७

* भारतीय पालक पाल्यांच्या प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणावर सरासरी १२.२२ लाख रुपये [ १८,९०९ डॉलर ] एवढा खर्च करत असल्याचे एक सर्वेक्षणात समोर आले आहे.

* जागतिक सरासरीच्या प्रमाणामध्ये शिक्षणावर खर्च करण्याचे भारतीयांचे प्रमाण कमी आहे. शिक्षणावर खर्च करण्याची जागतिक सरासरी २५,५८००० [ ४४,२११ डॉलर ] एवढी आहे.

* याबाबत एचएसबीसी ने शिक्षणाच्या मूल्यसंदर्भात संशोधन केले असून यामध्ये शिक्षणावरील खर्चाचे प्रमाण दर्शविण्यात आले आहे.

* भारतीय पालक मुलांच्या प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीपर्यत १२ लाख २२ हजारापर्यंत खर्च करत असतात. या खर्चामध्ये शिक्षण शुल्क, पुस्तके, वाहतूक, व निवास खर्च आदींचा समावेश होतो.

* जगात हॉंगकॉंग मधील पालक मुलांच्या शिक्षणावर सर्वाधिक १ लाख ३२ हजार डॉलर खर्च करतात. शिक्षणाच्या मूल्यसंदर्भात एचएसबीसीने १५ देश व प्रांतांमधील ८ हजार ४८१ पालकांची मते जाणून घेतली.

* यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रिटन, आणि अमेरिका, या देशांचा समावेश आहे.

* भारतीय पालकांमधील १० पैकी ९ पालक ९४% मुलांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा विचार करतात. तर ७९% पालक पाल्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी योगदान देत असतात.

* भारतामधील पालकांना पदव्युत्तर पदवीमुळे आपल्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल. अशी आशा असते. असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.