बुधवार, २६ जुलै, २०१७

जागतिक जलतरण स्पर्धेत ऍडम पिटीचा ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात विश्वविक्रम - २७ जुलै २०१७

जागतिक जलतरण स्पर्धेत  ऍडम पिटीचा ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात विश्वविक्रम - २७ जुलै २०१७

* हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत ब्रिटनच्या ऍडम पिटीचा याने पुरुषाच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली आहे.

* जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने २६.१० अशी विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. ब्रिटनच्या २२ वर्षीय ऍडमने २ वर्षांपूर्वी नोंदवलेला आपलाच २६.४२ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला.

* अंतिम फेरीत त्याच्यासमोर कॅमेरॉन व्हॅन डर याचे आव्हान होते. तो त्याच्यापेक्षा ४४ सेकंदाने मागे राहिला.

* महिलांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात स्वीडनच्या सारा स्योस्ट्रम हिने ५५.५३ सेकंड अशी वेश देत स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. तिचे जागतिक स्पर्धेतील नववे पदक आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.