शनिवार, १५ जुलै, २०१७

गर्बिन मुगुरुझा २०१७ ची विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेती - १६ जुलै २०१७

गर्बिन मुगुरुझा २०१७ ची विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेती - १६ जुलै २०१७४

* स्पेनच्या २३ वर्षीय गर्बिन मुगुरुझाने अमेरिकेच्या ३७ वर्षाच्या व्हीनस विलियम्सला हरवून ७-५,६-०, अशा फरकाने पराभव करत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या विजेतेपदावर नाव कोरले.

* गर्बिनचे आजवरच्या कारकिर्दीतले हे दुसरे ग्रँडस्लॅम असून गेल्यावर्षी सेरेना विल्यम्सला हरवून फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम तिने गाजवला होता.

* सात वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या व्हीनस वर मात करून गर्बिन मुगुरुझा हिने अभूतपूर्व यश मिळवले आहे. विम्ब्लडन जिंकणारी ती स्पेनची दुसरी महिला टेनिसपटू ठरली. याच्या आधी १९९४ मध्ये कॉनचिटा मार्टिन ने विम्ब्लडन किताब जिंकले होते.

* याआधी गर्बिन मुगुरुझाने २०१५ च्या विम्ब्लडनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु ती त्यावेळेस अपयशी ठरली.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.