बुधवार, २६ जुलै, २०१७

अल्फाबेटच्या संचालकपदी सुंदर पिचाई यांची निवड - २६ जुलै २०१७

अल्फाबेटच्या संचालकपदी सुंदर पिचाई यांची निवड - २६ जुलै २०१७

* गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली.

* याबाबत अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज म्हणाले, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुंदर पिचाई चांगल्या पद्धतीने काम करीत आहे.

* त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाढ होत असून नाविण्यपूर्ण उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ते अल्फाबेटच्या संचालक मंडळावर आल्याने त्यांच्यासमवेत काम करण्यास मी उत्सुक आहे असे त्यांनी म्हटले.

* पिचाई यांनी २०१४ मध्ये कंपनीतील उत्पादन, अभियांत्रिकी आणि संशोधन विभागांचा ताबा त्यांच्याकडे घेतला. कंपनीचे युजर एक अब्जाहुन अधिक वाढविण्यात त्यांनी योगदान दिले आहे.

* जाहिरातींचे उत्पन्न आणि युट्युबमधील व्यवसाय त्यांनी हातभार लावला आहे. गुगलमधील उत्पादनाचा विकास आणि तंत्रज्ञानविषयक धोरण याची जबाबदारी पिचाई याच्यावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.