बुधवार, २६ जुलै, २०१७

बिहारच्या राजकारणाच्या नाटकाचा शेवट आणि नितीश कुमार घेणार आज मुख्यमंत्र्याची शपत - २७ जुलै २०१७

बिहारच्या राजकारणाच्या नाटकाचा शेवट आणि नितीश कुमार घेणार आज मुख्यमंत्र्याची शपत - २७ जुलै २०१७

* बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध या संघर्षाला काल संध्याकाळी निर्णायक वळण मिळाले. महायुती तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला.

* बिहारमध्ये एकूण सदस्य २४३ आहेत. बहुमतासाठी आवश्यक १२२ सदस्य आवश्यक आहेत. सध्याचे पक्षीय बलाबल राष्ट्रीय जनता दल ८० सदस्य [ RJD ], संयुक्त जनता दल ७१ सदस्य [ JDU ], भाजप ५३, काँग्रेस २७, इतर १२ सदस्य.

* गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रीय जनता द
लाचे राजद नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

* त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.

* बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनाटेड [ जदयू ], आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचे सरकार स्थापन केले होते.

* या सर्व राजकीय नाट्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

* आणि अखेर नरेंद्र मोदींशी चर्चा करून भाजपचा सशर्त पाठिंबा मिळवत आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.