शुक्रवार, १४ जुलै, २०१७

डॉ जयनारायण व्यास यांना जलमित्र पुरस्कार जाहीर - १५ जुलै २०१७

डॉ जयनारायण व्यास यांना जलमित्र पुरस्कार जाहीर - १५ जुलै २०१७

* पाण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे देण्यात येणारा जलमित्र पुरस्कार डॉ जयनारायण व्यास यांना प्रदान करण्यात आला. ते गुजरात येथील माजी जलसंपदा आणि आरोग्यमंत्री होते.

* सरदार सरोवर नर्मदा प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी डॉ व्यास यांनी योगदान दिले. तसेच काक्रापार प्रकल्पाचे पुनरुज्जीवन, क्षारपड जमीन सुधार, देवधा टाइटल रेग्युलेटर योजना, स्विचिंग अँड ड्रिंकिंग वॉटर सोर्स या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

* येत्या रविवारी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.