सोमवार, ३ जुलै, २०१७

राज्यातील सरपंचाची निवड थेट जनतेद्वारे होणार - ४ जुलै २०१७

राज्यातील सरपंचाची निवड थेट जनतेद्वारे होणार - ४ जुलै २०१७

* राज्यातील सरपंचांची निवड थेट जनतेद्वारे होणार आहे. तसेच सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान ७ वी इयत्ता पासची अट असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय झाला.

* राज्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंचांची निवड करण्यात येते. देशातील गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात सरपंचांची निवड जातेद्वारे निवड केली जाते.

* ग्रामपंचायतीशी विचारविनिमय करून ग्रामसभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली एक किंवा अधिक ग्रामविकास समित्यांची स्थापना करणार आहे.

* चालू वर्षाअखेर होणाऱ्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंच हे थेट जनतेद्वारे निवडले जातील. असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

* १४ व्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतीत थेट पैसा येतो तसेच राज्य सरकारने सुद्धा ग्रामपंचायतीना बरेच अधिकार दिले आहे त्यामुळे त्या सर्व निधीचे व कार्याचे अचूक विकास व्हावा यासाठी सरपंच पदासाठी इयत्ता ७ वी ही शासनाने घातली असून ती वाढविण्यात येणार आहे.

[ आतापर्यंत सरपंचांची निवड पद्धती ]

* ग्रामसेवकाच्या देखरेखेखाली सरपंच निवड प्रक्रिया होत असे.

* सरपंचपदासाठी अर्ज मागवले जातात.

* ग्रामसेवक नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावतात.

* या बैठकीत सरपंचपदासाठीच्या अर्जावर मतदान होत असे.

* निवडून आलेले सदस्यच सरपंचपदासाठी मतदान करू शकत.

* ज्या उमेदवाराला जास्त मत मिळतील, तो सरपंच होत असे.

* सरकारने आता हे सर्व नियम बदलून थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.