गुरुवार, ६ जुलै, २०१७

फिफाच्या फुटबॉल रँकिंगमध्ये भारत ९६ व्या स्थानावर - ७ जुलै २०१७

फिफाच्या फुटबॉल रँकिंगमध्ये भारत ९६ व्या स्थानावर - ७ जुलै २०१७

* फिफाच्या जाहीर झालेल्या फुटबॉल रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल संघाने गेल्या २० वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ९६ वे स्थान पटकावले आहे.

* भारताने याआधी १९९३ मध्ये ९४ व्या स्थानावर झेप घेतली होती. आशियात भारताचा १२ वा क्रमांक असून इराण अव्वल स्थानावर होता.

* राष्ट्रीय संघाच्या सततच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाचे रँकिंग सुधारत असून गेल्या २ वर्षात संघाने ७७ स्थानांची झेप घेतली आहे.

* या यादीत विश्व चॅम्पियन जर्मनीने ब्राझीलला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले अर्जेंटिना तिसऱ्या पोर्तुगाल चौथ्या आणि स्वित्झर्लंड पाचव्या स्थानावर आहे.

* भारतीय फुटबॉलसाठी हे मोठे पाऊल आहे.  २ वर्षाआधीचे चित्र आता बदलत आहे. असे एआयएफएफ चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.