मंगळवार, ११ जुलै, २०१७

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती - १२ जुलै २०१७

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती - १२ जुलै २०१७

* गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला निर्णय अखेर घेतला असूनभारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची नियुक्ती करण्यात आली.

* याबरोबरच दोन अन्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली यामध्ये माजी गोलंदाज झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

* तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

* बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी के खन्ना यांनी आज रात्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांबाबत अधिकृत घोषणा केली.

* कर्णधार विराट कोहलीची पसंती असल्याने प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर होते.

* प्रशिक्षक पदासाठी वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, रवी शास्त्री, लालचंद राजपूत, टॉम मुडी यांचे नाव आघाडीवर होते.  एकूण १० जणांनी यासाठी अर्ज केला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.