रविवार, २ जुलै, २०१७

रहस्यमय बर्मुडा ट्रँगल मध्येच अचानक शेली आयर्लंड बेट तयार झाले - ३ जुलै २०१७

रहस्यमय बर्मुडा ट्रँगल मध्येच अचानक शेली आयर्लंड बेट तयार झाले -  ३ जुलै २०१७

* हजारो माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आणि ७५ हुन अधिक विमान आणि जहाज गायब झालेल्या रहस्यमय बर्मुडा ट्रँगल मध्येच अचानक शेली आयर्लंड बेट तयार झाले आहे. असे वृत्त द सन या वृत्तपत्राने दिले आहे.

* काही महिन्यापूर्वी  बर्मुडा ट्रँगचे रहस्य उलगडले आहे असे संशोधकांनी सांगितले होते पण या बेटामुळे या बेटाच रहस्य अधिक वाढलं आहे.

* उत्तर कॅरोलिनामध्ये केप पॉईंटजवळ एक बेट तयार झाले आहे. स्थानिकांनी या बेटाला [ शेली आर्यलँड ] असे नाव दिले आहे. तेव्हा हे बेट पाहण्याचं कुतूहल लोकामध्ये निर्माण झालं आहे.

* पण या बेटाच्या जवळ न जाण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलं कारण यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या भागात स्टिंग रे आणि शार्क यासारखे मोठे मासे असल्याने ते हल्ला करू शकतात.

[ बर्मुडा ट्रँगलच्या रहस्याविषयी ]

* अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान बर्मुडा ट्रँगल हा पट्टा येतो.

* ५ हजार किलोमीटरच्या या पट्ट्यात गेल्या १०० वर्षात ७५ विमान आणि १०० हुन अधिक जहाज बेपत्ता झाली आहेत. यामध्ये १००० लोकांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

* विशेष म्हणजे या विमान किंवा जहाजांचे अवशेषही कधी सापडू शकले नाही. ऑकटोम्बर महिन्यात बर्मुडा ट्रँगल विषयी रहस्य उलगडण्यात आलं होत.

* अटलांटीक महासागरात या पट्ट्यात षट्कोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात. यासोबत १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात.

* या फेऱ्यात अडकून जहाजे बुडू शकतात. आणि विमानही समुद्रात पडण्याची दाट शक्यता असते. असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता.

* पण आता बर्मुडा ट्रँगल या भागात तयार झालेल्या या नवीन बेटामुळे शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.