बुधवार, १२ जुलै, २०१७

भारताची महिला स्टार क्रिकेटपटू मिताली राज ६००० धावा करणारी पहिली खेळाडू - १३ जुलै २०१७

भारताची महिला स्टार क्रिकेटपटू मिताली राज ६००० धावा करणारी पहिली खेळाडू - १३ जुलै २०१७

* भारताची महिला स्टार क्रिकेटपटू मिताली राज हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला आहे. एवढेच नव्हे तर ६००० धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

* आयसीसी महिला विश्वचषकात आस्ट्रेलिया विरुद्ध साखळी फेरीतील सामन्यात ३४ धावा करताच मिताली राजने हा धावांचा एव्हरेस्ट सर केला.

* १९९९ मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय कर्णधार मिताली राजचा १८३ वा एकदिवसीय सामना होता. याशिवाय तिने १० कसोटीत ६६३ तर ६३ टी - २० सामन्यात १७०८ धावा केल्या आहेत.

* तिच्या नावावर ५ एकदिवसीय शतके आणि ४९ अर्धशतकांची नोंद आहे.

* तर गोलंदाजी क्षेत्रात झुलन गोस्वामी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. तिने आतापर्यंत १८९ बळी आहेत.

* योगायोग म्हणजे पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसकीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

* १६ वर्षे २०५ दिवस एवढे वय असताना मितालीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकाविले ती सर्वात तरुण फलंदाजी होती.

* ११४ धावांची पदार्पणात खेळी आयर्लंडविरुद्ध १९९९ मध्ये ही कामगिरी महिला क्रिकेटमध्ये ५ फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. पदार्पणात मितालीची ३ ऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.