शनिवार, २२ जुलै, २०१७

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी निवृत्तीवेतन योजना - २२ जुलै २०१७

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी निवृत्तीवेतन योजना - २२ जुलै २०१७

* ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी निवृत्ती वेतन योजना मोदी सरकारने आणली असून त्यामध्ये १० वर्षाच्या कालावधीसाठी ८% व्याजदर मिळणार आहे.

* व्याजदराची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.

* ही गुंतवणूक ३ मे २०१८ पर्यंत करावी लागणार आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही स्वरूपात करता येईल.

* या योजनेत ३ वर्षानंतर ७५% कर्जही काढता येईल. त्याशिवाय मुदतीआधीच योजना बंद करता येईल. त्या स्थितीमध्ये गुंतविलेल्या रकमेच्या ९८% रक्कम परत मिळेल.

* १० वर्षाचा कालावधी संपताना विमाधारकाला संपूर्ण रक्कम व निवृत्तीवेतनाचा शेवटचा हफ्ता मिळेल. आणि १० वर्षाच्या कालावधीत मृत्यू झाल्यास गुंतवलेली रक्कम लाभार्थ्यांचे नामनिर्देशात केलेल्या व्यक्तीला मिळेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.