गुरुवार, २० जुलै, २०१७

रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती - २० जुलै २०१७

रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती - २० जुलै २०१७

* भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. १७ जुलैला राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रालोआ उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झाले आहेत. 
Ramnath kovind 14th president of india - 2017
* रामनाथ कोविंद यांना ६५.३५% मते मिळाली तर मीरा कुमार यांना ३४.३५% मते मिळाली. प्रत्यक्ष मतांची आकडेवारी केल्यास कोविंद यांना एकूण ७ लाख २ हजार ०४४ तर मीरा कुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली. 

* या निवडणुकीत विविध राज्यातील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९% आमदार खासदारांनी १७ जुलै रोजी मतदान करण्याचा अधिकार बजावला. 

* येत्या २५ जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतील. 

[ रामनाथ कोविंद यांचा परिचय ] 

* रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराउंख गावात १ ऑकटोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. 

* रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा उल्लेख अनुसूचित जातीमध्ये केला जातो. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. 

* रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. 

* यानंतर ३ वर्षांनी १९९४ मध्ये यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून २ वेळा राज्यसभेवर निवडून आले. 

* १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. पक्षाचा दलित चेहरा असलेले रामनाथ कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील राहिले आहेत. 

* ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली. तसेच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.